अन्याय - अत्याचाराला व वाढत्या महागाईला पँथर स्टाईलने देणार चकराप : राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे
ठाणे प्रतिनिधी  : 1972 च्या काळात राज्यातील बौद्ध,मागासवर्गीय व महिला अत्याचाराच्या विरोधात आक्रमण भूमिका घेण्यासाठी दलित पँथरची स्थापना केली. दलित पँथरमुळे अनेक पीडितांना राज्यात संरक्षण मिळाले.             त्याच प्रमाणे वर्तमानातही दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात व वाढती महागाई, बेरोजगारी तसेच महिला अत्याचारा विरोधात  आम्ही राज्यभर पँथर  स्टाईलने उग्र निदर्शने,आंदोलन व वेळ प्रसंगी उपोषण करून समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन दलित पँथर चे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी शासकीय  विश्रामगृह ठाणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.       पुढे ते म्हणाले की संभाजी भिडे हा विकृत बुद्धीचा आहे त्याने भारतीय नागरिकांना बेशरम असे बोलून त्याने देशातील तमाम  नागरिकांचा अपमान केला आहे. याबाबद संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे सरकार करत नसेल तर विकृत भिडेला पँथर स्टाईल उत्तर देऊ असे ही राष्ट्रीय अध्यक्ष तायडे म्हणाले. 

       


           यावेळी राज्यातील दलित पँथर मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. तर अनेक गटातील तरुणांनी दलित पँथर संघटनेत प्रवेश घेतला. प्रसंगी कोर्ट नाका येथील राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रामभाऊ तायडेसह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले

Post a Comment

0 Comments