डोंबिवलीतील पीडितेची केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या रविवारी घेणार सांत्वपनर भेट
मुंबई दि. 2 :- डोंबिवली मध्ये सामूहिक बलात्काराची महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली होती. त्यातील पीडित मुलीची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उद्या रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी मानपाडा पोलीस थांव येथे सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत करणार आहेत.         डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीस महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधींतुन 20 लाखांची मदत करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. मात्र त्याबाबत अद्याप मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतलेला स्पष्ट झालेले नाही.          राज्य शासनातर्फे मदत अद्याप मिळाली नसल्याचे पार्श्वभूमीवर ना रामदास आठवले अत्याचार पीडित मुलीची भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे सांत्वपर  आर्थिक मदत करणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.            उद्या रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हे त्या पीडित मुलीची सांत्वनपर भेट घेणार आहेत अशी माहिती रिपाइं चे  डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments