होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्यूमैनिटी आणि गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण

   



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : होप मिरर फाउंडेशनने गुरुवारी पहिला गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार आणि पहिला गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटीलएसीपी सुनील बोंडे आणि चंद्रकांत मते हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला एकता मंचने पाठिंबा दिला. वर्सोवाअंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात संपुर्ण भारतातील  पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.



 सामाजिक कार्यकर्ते सागर उत्वलशाहनवाज शेखडॉ नूरी परीमनीष गुप्तासुमन ऑस्करअरुणा नाभसदफ शेखसिंधू नायरस्वामी अभिनंदगिरी महाराजस्वप्नील शिरसाठ आणि सुंदरी ठाकूर यांना चांगल्या कार्यासाठी कौतुकाचे प्रतिक म्हणून गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार देण्यात आला.  तर समाजकल्याण क्षेत्र सुप्रसिद्ध कलाकारगायक आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या उद्योगातील उत्कृष्टतेसाठी गोल्डन प्रेस्टीज पुरस्कार प्राप्त झाला. 



मीनाक्षी दीक्षितकेट शर्मानिकिता रावलव्हीआयपीगायक दिलीप सेनसंदिप सोपरकरआरती नागपालपंकज बेरीशर्लिन चोप्राशिव्या पठाणियापायल घोषनायरा बॅनर्जीवेरोनिका वनीज आणि अरुण बक्षी, पत्रकार कुणाल म्हात्रे, मिलिंद जाधव यांना गोल्डन  प्रेस्टीजियस पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.



होप मिरर फाउंडेशन ही नवी मुंबई स्थित सामाजिक संस्था आहे. जी लॉकडाऊनमार्च २०२० पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक रमजान शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करताना "सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू होता. त्यांचे कल्याण करा आणि त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे रमजान शेख यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments