दिव्याच्या पाणी प्रश्नावर भाजप आमदार व आयुक्त बैठक

 दिवा, प्रतिनिधी  :  दिव्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून नुकताच भाजप दिवा विभागाने आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयावर भव्य हंडा-कळशी मोर्चा काढला होता. त्यानुसार आयुक्तांनी दिलेल्या अश्वासना नुसार आज भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, नारायण पवार व दिवा भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली.             दिव्याचा पाणी प्रश्न लवकर सुटावा यासाठी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत खलील विषयांवर चर्चा झाली दिवा पश्चिमच्या पाणी टंचाई वर त्वरित तोडगा काढावा, पुशिंग पद्धतीने येणाऱ्या पाईप लाईन चे काम त्वरित सुरू करावे, एन आर नगर व क्रिश कॉलोनी साठी पूर्वेवरून येणारी जुनी पाईप लाईन नवी लाईन टाकून पूर्वरत करावी.               साळवी नगर, यशोदा पाटील नगर, साबे( डी जी कॉम्प्लेक्स) व बेडेकर नगर, जीवदानी नगर, स्मशानभूमी रस्ता, बेतवडे येथे नवीन पाईप लाईन  येथे नवीन पाईप लाईन टाकावी. शोल्क नगर, मुंब्रादेवी कॉलोनी येथे नियमित आणि रोज पाणी पुरवठा करावा व वेळेत बदल करावा पाणी माफिया आणि टँकर लॉबी यांच्यावर कारवाही करावी.


              अशा विषयांवर चर्चा झाली व लवकरच वरील मागण्याची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. यावेळी दिवा विभागातून निलेश पाटील, अँड.आदेश भगत, रोहिदास मुंडे, विजय भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments