भाजपातर्फे जेष्ठ नागरिकांना ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरांची सफर भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांचा पुढाकार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरांचे संपूर्ण दर्शन आता नवीन आकर्षक बसद्वारे करण्यात येणार आहे. भाजपाच्या वतीने या बसमधून जेष्ठ नागरिकांना संपूर्ण शहराचे मोफत दर्शन घडविण्यात आले.       केडी/एमसी परिवहन उपक्रमाची ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरांचे दर्शन हि बस मंगळवारपासून रस्त्यावर धावण्यास सुरवात झाली आहे. या बसमधून जेष्ठ नागरिकांना संपूर्ण शहरांचे दर्शन करण्यात यावे, याकरिता भाजपाचे कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष तथा परिवहन सदस्य संजय मोरे यांनी स्वतः खर्च करून जेष्ठांना शहर दर्शनाची सुविधा पुरविली. या उपक्रमाचा शुभारंभ कल्याण पूर्वेतील स्वराज कार्यालय येथून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात २५ जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहेत.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग भरारी घेणारी पिढी घडत असते. त्यांच्या अनुभवाचा उपयोग युवा पिढी घडविण्यासाठी झाला पाहिजे. सांस्कृतिक व ऐतिहासिक शहरांचे दर्शन होण्यासाठी गाईड व परिवहन कर्मचारी योगदान देतील व प्रवास सुखकर करतील असा विश्वास आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी संजय मोरे म्हणाले कि, भाजपा कल्याण पूर्व मंडल जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहील. यापुढेही जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासाठी नियोजन करणार. तसेच कल्याण पूर्वमधील जागृत देवस्थान श्री तिसाई मंदिराचा दर्शन मार्गामध्ये व उपक्रमात सहभाग करून घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, सरचिटणीस नितेश म्हात्रे, महिला मोर्चा उपजिल्हाध्यक्ष वंदना मोरेवार्ड अध्यक्ष सुनीता गरुड, परिवहन व्यवस्थापन समिती व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments