सम्राट अशोक चौक परिसरात आमदार निधीतून रस्त्याचे काँक्रीटी करण

  कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण पश्चिमेतील माता रमाबाई आंबेडकर उद्यान परिसरातील सम्राट अशोक चौक येथील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात येत असून त्यांच्याहस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक मोहन उगले यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.       कल्याण मधील अनेक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून यामुळे रस्त्यांचे आयुष्य हे दीर्घकाळ राहते. अशाचप्रकारे चांगला रस्ता बनविण्याची मागणी प्रभाग क्र. २१ फडके मैदान येथील रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांनी नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे केली होती. याबाबत उगले यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दलित वस्ती सुधारणा निधीतून २५ लाखांचा निधी वापरून याठिकाणी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.          यावेळी उपजिल्हा प्रमुख अरविंद मोरे, उपशहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, शाखा प्रमुख अनंता पगार, स्वप्नील मोरे तसेच तेथील दीपक भालेरावराहुल भालेरावदिनेश जाधवविनोद जाधवमहादू गायकवाडरवी गायकवाड तसेच स्थानिक नागरिक व प्रभागातील समस्त शिवसैनिक पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments