आपल्या चिमुकल्यांसोबत वेशभुषा स्पर्धा व दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे : #अभिनयकट्टा #दीपोत्सव साजरा करत आहे. रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायं. ६ वाजता अभिनय कट्ट्यावर लहान मुलांकरिता वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वयोगट ५ ते १५ असून वेशभुषा पारंपारिक, ऐतिहासिक,पौराणिक उदा. राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले, श्री स्वामी समर्थ, साईबाबा, स्वामी विवेकानंद अशा प्रकारच्या इतर कोणत्याही व्यक्तिरेखा आपण वेशभुषा करून सादर करू शकता.

आपल्या चिमुकल्यांसोबत वेशभुषा स्पर्धा व दीपोत्सव  कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

या स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी लागणार असून प्रथम तीन क्रमांक निवडले जाणार असून, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र मिळणार आहे.

याच सर्व वेशभूषा स्पर्धकांना घेऊन दीपोत्सव सुद्धा साजरा करण्यात येईल. त्याचप्रमाणे ५१ अंध व्यक्तींना घेऊन हा आगळावेगळा दीपोत्सव साजरा होणार आहे. तरीही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण या दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक किरण नाकती यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 9819129277

या वेशभुषा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपले नाव,वय, वेशभुषा साकारणाऱ्या व्यक्तिरेखेचे नाव 9819129277या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप करावेत. 

- किरण नाकती

Post a Comment

0 Comments