केडीएमसीच्या आय आणि फ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आय आणि फ प्रभागक्षेत्र परिसरातील अनाधिकृत बांधकामावर मनपाने जेसीबी चालवित पाडकाम जमीनदोस्त  करण्याची धडक कारवाई केली. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार फ प्रभागातील सहा. आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व, भोईरवाडी, खंबाळपाडा येथील डॅडी चौक,कृष्णा व्हिला इमारतीच्या बाजूला जमिनमालक अशोक शेलार यांच्या मालकीच्या जागेवर बांधकामधारक चेतन पाटील व भगवान पाटील यांनी तळ+1 मजल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते.              या इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच करण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, अधिक्षक दिनेश वाघचौरे, टिळक नगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1, पोकलेन, 1 जेसीबी, 2 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली .            आय प्रभागातही विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली आय प्रभागातील सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (पूर्व),मौजे द्वारली मलंग रोड रस्ता येथे पंडित सीताराम पाटील व इतर कृष्णा डेव्हलपर्स व हनुमान सरोदे यांच्या 12 अनधिकृत गाळयांचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. ही  कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व 2 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली .

Post a Comment

0 Comments