स्वच्छ प्रभाग सुंदर बाग संकल्पनेतून कचरा वर्गीकरणाच्या डब्ब्यांचे वितरण विभाग प्रमुख, नगरसेवक मोहन उगले यांचा उपक्रम
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वच्छेतेच्या बाबतीत चांगला क्रमांक मिळवीत असून प्रत्येक प्रभाग स्वच्छ असल्यास हा क्रमांक आणखी अव्वलस्थानी येईल यासाठी हातभार लागावा म्हणून स्वच्छ  प्रभाग सुंदर बाग हि मोहीम प्रभाग क्र. २१, २२ आणि २९ मध्ये शिवसेना विभाग प्रमुख तथा नगरसेवक मोहन उगले राबवत असून या मोहिमेंतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रभागातील सोसायट्यांना कचऱ्याचे मोठे डब्बे वितरीत करण्यात आले.     कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, बेतूरकर पाडा, ठाणकर पाडा या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ओला कचरासुखा कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सोसायटीच्या मागणीनुसार प्रत्येक सोसायटीला दोन मोठे डब्बे नगरसेवक मोहन उगले यांच्यावतीने देण्यात आले. या आधी देखील प्रभागात अशा प्रकारचे डब्बे देण्यात आले असून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने आता पुन्हा कायापालट अभियान सुरु केले असून त्याला हातभार म्हणून हा उपक्रम सुरु केला असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले.  यावेळी  नगरसेवक मोहन उगलेशहर संघटक सुजाता धारगळकरमहीला शाखा संघटक नेत्रा उगलेमीना सावंतशाखाप्रमुख स्वप्नील मोरेअंनता पगार यांच्यासह शिवसेना कार्यकते महीला आघाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments