अट्टल चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रँचकडून अटक


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने नवी मुंबईतील दोघा अट्टल चोरांना अटक केली आहे. या दुकलीकडून क्राईम ब्रँचने  ४ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले असून चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. ऋतीक वामन घरत (खारघर) आणि विक्रम विलास पाटील (तळोजा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून या दुकलीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.              पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास मानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचचे कल्याण युनिट करत होते. ही चोरी खारघर येथे राहणारा ऋतीक घरत आणि तळोज्यात राहणारा विक्रम पाटील यांनी केल्याचे क्राईम ब्रँचचे सचिन साळवी आणि गुरूनाथ जरग यांना समजले. त्यानुसार वपोनि मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण दायमा, फौजदार मोहन कळमकर, हवा. सचिन साळवी, अनुप कामत, गुरूनाथ जरग, राहूल ईशी या पथकाने पळण्याच्या बेतात असलेल्या ऋतीक घरत याला सापळा लावून ताब्यात घेतले. 
            चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबूली दिली. त्यानुसार या पथकाने तळोज्यातील रोहिजन गावात लपलेल्या विक्रम पाटील याच्या मुसक्या आवळल्या. या दुकलीने कल्याण-शिळ मार्गावरील निळजे गावात असलेल्या काळूबाई चौकातील श्रीकृष्ण मंदिरासमोर, तसेच कोळेगाव, खोणीगाव तळोजा (धारणेगाव), याठिकाणी चोऱ्या केल्याची कबूली दिली. 
           या दुकलीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात 3, तळोजा पोलिस ठाण्यात १ , असे तूर्त ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती हाती आली आहे. या दुकलीकडून आतापर्यंत एक स्कुटर हस्तगत करण्यात आली आहे. मात्र या दुकलीवर ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांतून चोरीचे बरेच गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांचा अभिलेख तपासण्यात येत असल्याचे वपोनि मनोहर पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments