समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई दि. 24 :-  महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पुढीलप्रमाणे 8 मागण्यांचे निवेदन सादर केली.यावेळी शिष्टमंडळात ना. रामदास आठवले।यांच्या समवेत रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग उपस्थित होते.          नार्कोटिक्स विभागाचे मुंबई संचालक समीर वानखेडे हे मागासवर्गीय कर्तबगार अधिकारी आहेत. युवा पिढीला ड्रग्स चा विळखा पडू नये यासाठी ते चांगले काम करीत आहेत. त्यांच्या जीविताला धोका होऊ नये याची राज्य सरकार ने खबरदारी  घ्यावी 


 

        एक  प्रभाग तीन सदस्य ही निवडणूक पद्धत लोकशाहीला हरताळ फासणारी असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक वॉर्ड एक सदस्य हीच निवडणूक पद्धत घ्यावी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण असलेच पाहिजे त्याशिवाय निवडणुका होता कामा नयेत; राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत करावी ; 


5) वाढते दलित अत्याचार रोखवेत; त्यासाठी  ऍट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलबाजवणी करावी;


6) अत्याचार पीडित महिलांना 50 लाखांची आर्थिक सांत्वनपर मदत करावी


7)  मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून  आरक्षण देण्यात यावे

          

8)अनुसूचित जाती जमातींच्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना   पदोन्नती मधील आरक्षण देण्यात यावे.

Post a Comment

0 Comments