राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन महाग पेट्रोल घेणार्‍या वाहन धारकांचा केला सत्कार
ठाणे (प्रतिनिधी)  - दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. बुधवारी ठाण्यात पेट्रोलचे दर 112 रुपयांवर गेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेवर शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाईतही इंधन भरणार्‍या वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सत्कार केला.            इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे इंधन भरणार्‍या वाहनधारकांना चक्क गुलाबपुष्प देऊन तसेच त्यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेक पुसाळकर यांनी सांगितले की, महागाईचा आगडोंब उसळला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारने इंधनाचे दर सोन्याच्या दराजवळ नेण्याचा ‘कट’ आखला आहे.           याची कल्पना असूनही तोंड दाबून बुक्क्याचा मार  जनतेला सहन करावा लागत आहे. हा मार सहन करणार्‍या वाहनधारकांचा आम्ही पेढे भरवून आणि फुले देऊन सत्कार करण्यात आला. आज जर या महागाईविरोधात सामान्य जनता बंड करणार नसेल तर उद्या आपणाला जगणेही असह्य होणार आहे. याची जाणीव वाहनधारकांना व्हावी, यासाठीच हे आंदोलन केले आहे. यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.             या आंदोलनात अभिषेक पुसाळकर दिनेश सुधाकर बने,  वैभव विचारे, श्रीकांतभोईर, संदीप  येताळ, आराफट खानबंडे, निखिल तांबे, विजय यादव, रवी गलाटे,  के.पी. आहाद, विषयांत गायकवाड, नासिर शेख, मुझफ्फर मुल्ला, संतोष मोरे , साहिल मिलिंद बनकर, श्रावण भोसले, शिवम नाईक, तुषार धात्रक, आकाश पगारे, सिद्दी शेख,   संजय साळुंखे,  दिलीप उपाडे, वसीम खान,  समीर नेटके,  ज्ञानेश्वर राजपनखे,  कुणाल भोईर,  आशिष वाघ , अजिंक्य खंदारे,  शशांक शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments