रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.बुधवारी संघटनेच्या ओबीसी आघाडी अध्यक्षा निर्मला कदम यासह पदाधिकारी यांनी कल्याण तहसीलदार विजय पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला.  

 


         निवदेनात म्हटले आहे कि, राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्तांना मदत देणार असल्याचे आश्वासन दिले होते.६ ऑक्टोबर २०२१ च्या जी.आर.नुसार शासनाने आपत्तीग्रस्तांना अल्प मदत केली.फडणवीस सरकारने २०१९ साली आपत्ती ग्रस्तांसाठी काढलेल्या जी.आर.प्रमाणे मदत देणे आवश्यक होते. जिरायत पिकासाठी हेक्टरी ६० हजार रुपये व बागायतीपिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपये तातडीने मदत द्यायला हवी होती.              शेतकऱ्यांंचे  चालू पिक कर्ज माफ करण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर  शासनाच्या जी.आर ची होळी करण्यात येईल.८ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सोयाबीनवर स्टाॅक लिमिटचा केंद्राचा जी.आर लागू न करण्याचा अधिकारी आहे. राज्य सरकारने तो अधिकार वापरून सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा.दोन्ही जी. आर.शेतकऱ्यावर अन्याय करणारे असून तो मागे घेण्यात आले नाही तर या दोन्ही जी.आर. ची होळी तहसीलदारकार्यालया समोर दोन्ही जी.आर.ची होळी करू असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments