पंचवीस वर्ष प्रेताच्या सरणाची राख सारत करते उदरनिर्वाह निर्मला भीमोरे या अष्टभुजा देवीला सलाम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमी मध्ये अष्टभुजा देवीच्या रूपात अंतिम संस्काराच्या अग्निडाहा नंतर थंड झालेली राख झाडत गोळा करीत स्माशनभुमीतील बर्निंग स्टँन्ड परिसर स्वच्छ करून स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांनी स्मशान स्वच्छतेचा वसा घेतला आहे.कल्याण मधील अष्टभुजा देवीच्या रुपात असलेली निर्मला भिमोरे गेली २५ वर्षापासून कल्याण मधील लाल चौकी परिसरा मधील स्मशानभूमीत अंतिम संस्कारच्या अग्नीडाहानंतर सरणाची  थंड झालेली राख साफ करीत स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकत स्वावलंबी जीवन जगत  स्माशनभुमी स्वच्छतेचे काम गेल्या २५ वर्षापासून करीत आहेत.  या अष्टभुजा प्रतिक असलेल्या निर्मलाने हजारो प्रेतांची राख स्वच्छ केली असुन कोवीड काळात स्माशनभुमीत जाण्याचे आपल्यांनी टाळले असे असताना देखील निर्मला यांनी स्वच्छतेचा वसा कायम ठेवत स्माशनभुमी स्वच्छेतेचे काम सुरू ठेवले आहे.पतीच्या आजारपणानंतर प्रेताची राख सावरण्याचे काम निर्मलाने हाती घेतले आणि ते आजवर सुरूच ठेवले आहे. प्रेताच्या नातेवाईकांनी दिलेल्या पैशांवर निर्मला यांचा उदरनिर्वाह चालत आहे. हिंदू धर्मामध्ये मरणानंतरची सेवा ही पुण्याची मानली जाते हीच सेवा निर्मला करीत असल्याने तिचे कौतुकही केले जाते. आशा कर्तुत्ववान निर्मला भीमोरे यांच्या कामाची दखल होणे गरजेचे आहे. 

Post a Comment

0 Comments