मच्छिमारांचे डिझेलच्या परताव्याचे १९६ कोटी रुपये थकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वेधले लक्ष

डोंबिवली   ( शंकर जाधव )  मुंबईसह कोकणातील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे तब्बल १९६ कोटी ६७ लाख रुपये थकीत आहेत. या परताव्याबाबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले असून, मच्छिमारांना लवकर परतावा देण्याची मागणी केली आहे.

  


          मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिमारांची संख्या लक्षणीय आहे. राज्य सरकारकडून मच्छिमारांना डिझेलसाठी अनुदान दिले जाते.
मात्र, वेळेत अनुदान न मिळाल्याने आता तब्बल १९६ कोटी ६७ लाख रुपये अनुदान थकले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात मासेमारी व्यवसाय बंद होता. त्यात मोठ्या प्रमाणावर मच्छिमारांचे नुकसान झाले. 
        त्यात डिझेल परतावा रखडल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीचा विचार करून डिझेल परतावा लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments