शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या १०० मुख्याध्यापकांचा सत्कार
कल्याण ( शंकर जाधव ) कोरोनाच्या  महामारीच्या काळात अनेक कोरोना योद्ध्यांनी आपले योगदान देऊन महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. यात डॉक्टर्स, परिचारिका पोलिस, सफाई कर्मचारी यांनी  योगदान दिले. त्यासोबतच शिक्षणाची ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांच्या साहाय्याने केले. या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यासाठी एसएसटी महाविद्यालयातकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
             यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष, तसेच ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे हे होते. उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरातील १०० पेक्षा जास्त शाळांच्या मुख्याध्यापकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित  करण्यात आले.राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकनरेंद्र पाटील , भोजराज रायसिंग, मुख्याध्यापिक विद्या कुलकर्णी, सुलभा बोंडे, उर्मिला चव्हाण यांना ही सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.         पहिल्या टप्प्यात अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि वांगणी या परिसरातील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला होता. कार्यक्रमात एसएसटी कॉलेजचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, तसेच जीआरसी हिंदी हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मिश्रा हे उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी  कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. मुख्याध्यापकांनी कोरोनाच्या काळात केलेल्या शैक्षणिक कामाचे कौतुकही केले. 
           सत्कार केलेल्या मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, असा कार्यक्रम मुख्याध्यापक किंवा शिक्षकांसाठी आजपर्यंत कुणीही केला नसेल. एसएसटी महाविद्यालयाने सत्कार केल्याबद्द्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जीवन विचारे, डॉ. खुशबू पुरस्वानी सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments