खड्ड्यात झाडे लावून रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध

गमतीदार, चित्रपट, आश्चर्यकारक, क्रीडाविश्व, धम्माल, राजकीय, खड्ड्यात  झाडे लावून रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध


मुरबाड । स्वस्तिक नावाच्या एका मोठ्या  स्ट्रोन क्रेशर कंपनीच्या अवजड डंपर वाहतुकीने  गेल्या दोन वर्षात नढई - नारिवली  रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करने प्रवाशांना जिकरीचे व धोक्याचे बनले आहे. अगोदरच अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.  अनेक लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

 या संदर्भात अनेक जागरुक नागरिकांनी , पत्रकारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने स्ट्रोन क्रेशर विरोधात व पडलेल्या खड्ड्यांविरोधात  कोणतीही ठोस कारवाई केली नाही. म्हणून भुवन येथे झालेल्या सभेमध्ये परिसरातील नागरिक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेचा विचार करता या परिसरातील भुवन, दहिगाव, जामघर, शेलारी, म्हाडस, बांधिवली, नारिवली, देहरी येथील ग्रामपंचायत सरपंच आणि काही होतकरु तरुण , पत्रकार एकत्र येऊन नढई - नारिवली रस्ता संघर्ष समितीने स्थापना केली. प्रशासनाचा निषेध म्हणून यावेळी रस्त्यातील  खड्यातच समितीने झाडे लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यापुढे या रस्ताच्या संदर्भात सर्व निर्णय, पुढील आंदोलनाची दिशा संघर्ष समितीच्या माध्यमातून केली जातील असे यावेळी सर्वानुमते  ठरविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments