वॉल्वो कार इंडिया तर्फे महाराष्ट्रात पेट्रोल माइल्ड - हायब्रिड्स सादर


■न्यू S90 व XC60 आकर्षक वॉल्वो सर्व्हिस पॅकेजसह होणार उपलब्ध XC90 पेट्रोल लवकरच होणार लाँच नव्या कारमध्ये गुगल सर्व्हिसेसअॅडव्हान्स्ड एअर क्लीनर व वॉल्वो कार्स अॅप इत्यादी नवे तंत्रज्ञान समाविष्ट....


मुंबई23 ऑक्टोबर2021 : महाराष्ट्रातील लक्झरीप्रेमी ग्राहकांना जागतिक पातळीवरील सर्वोत्तम तंत्रज्ञान ऑफर करण्यासाठी वॉल्वो कार इंडियातर्फे आज लक्झरी सेडान S90 आणि XC60 ही वॉल्वोची सर्वाधिक विक्री होणारी मिड-साइझ एसयूव्ही अशी दोन नवी पेट्रोल माइल्ड-हायब्रिड मॉडेल्स सादर करण्यात आली. 2021 पर्यंत पेट्रोल पोर्टफोलियो परिपूर्ण करण्याच्या कंपनीच्या ध्येयाशी हे लाँचेस सुसंगत आहेत. प्रभादेवी येथील अप्पासाहेब मराठे मार्गावरील केआयएफएस मोटर्स सी सिक्वेन्स येथे हा लाँच पार पडला.       न्यू पेट्रोल माइल्ड-हायब्रिड वॉल्वो S90 या गाडीची किंमत एक्स-शोरूम रु.61,90,000 इतकी आहे आणि न्यू पेट्रोल माइल्ड-हायब्रिड वॉल्वो XC60 या गाडीची एक्स शोरूम किंमत रु.61,90,000 इतकी आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट आहेज्यामुळे वॉल्वो ड्रायव्हिंगचा अनुभव वृद्धिंगत होतो. गुगल अॅप्सचा अॅक्सेस देणारी डिजिटल सर्व्हिसगुगल असिस्टिंटसह हँड्स फ्री मदत देणारी इतर अॅप्स व सेवांचागुगल मॅप्सच्या माध्यमातून मिळणारे या विभागातील सर्वोत्तम नॅव्हिगेशन दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. या कारमध्ये वापरण्यास सुलभनेक्स्ट जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे जी ग्राहकांना अभूतपूर्व पर्सनलायझेशन देते आणि अतुलनीय कनेक्टिव्हिटी बहाल करते.      नव्या पेट्रोल माइल्ड-हायब्रिड कार आणि नव्या तंत्रज्ञानाव्यतिरिक्त कंपनीने फक्त रु.75,000 अधिक लागू कर या खास किमतीला 3 वर्षांचे वॉल्वो सर्व्हिस पॅकेज जाहीर केले आहे. नव्याने लाँच केलेल्या कारसह हे पॅकेज विकत घेता येऊ शकते. ही आरंभानिमित्त ऑफर असून ती सध्याच्या उत्सवी हंगामापुरते आहेज्यात 3 वर्षांसाठी नियमित मेन्टेनन्स आणि दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश आहे.         “महाराष्ट्र ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमच्या सतत विस्तारणाऱ्या एकनिष्ठ ग्राहकांनी प्रगत तंत्रज्ञान व लक्झरी प्रवास ऑफर करणाऱ्या नव्या मॉडेल्सचे नेहमी स्वागतच केले आहे. या दोन मॉडेल्सच्या लाँचमुळे भारतीय बाजारपेठ आणि येतील ग्राहकांप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते. वॉल्वोची ओळख असलेली प्रगत सुरक्षा आणि लक्झरी ड्रायव्हिंग अनुभव हे दोन्ही फीचर्स न्यू S90 आणि न्यू XC60 मध्ये आहेत. ही दोन्ही मॉडेल्स माइल्ड-हायब्रिड असून या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान या गाड्यांमध्ये समाविष्ट आहेत.असे वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ज्योती मल्होत्रा म्हणाले.        गुगल अॅप्स व सेवांसह अँड्रॉइडचे पाठबळ लाभलेली इन्फोटेनमेंट यंत्रणा इंटिग्रेट करण्यासाठी वॉल्वो कार ग्रुपने गुगलशी हातमिळवणी केली आहे. वॉल्वो सुरक्षितता आणि शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे आणि आपल्या कार युझर्सना त्यांच्यातर्फे आधुनिक फीचर्स उपलब्ध करून देण्यात येतात.     S90 ही वॉल्वोची प्रीमिअम 4-दरवाजे, 5 आसने असलेली फ्लॅगशिप सेडान आहे. ही गाडी स्केलेबल प्रोडक्ट आर्किटेक्चर (एसपीए) या वॉल्वोच्या प्रगत मॉड्युलर व्हेइकल प्लॅटफॉर्मच्या आधारे तयार करण्यात आली आहे. एसपीए प्लॅटफॉर्ममुळे आजपर्यंतच्या सर्वात भक्कम वॉल्वो कार तयार झाल्या आहेत. कारण यात बोरॉन स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतोतसेच कारच्या आतील व बाहेरील बाजूस लोकांचे संरक्षम करणाऱ्या अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा डिझाइन करण्यात येतात.        2018 या वर्षी जगातील सर्वोत्तम कारचा पुरस्कार मिळालेली प्रचंड लोकप्रिय XC60 आता वॉल्वो कारमध्ये आधुनिक अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस) सेन्सर प्लॅटफॉर्म या विविध प्रकारचे रडारकॅमेरे व अल्ट्रासॉनिक सेन्सर्स समाविष्ट असलेल्या स्केलेबल अॅक्टिव्ह सुरक्षा यंत्रणांसरखे अॅडव्हान्स सेफ्टी अपग्रेड करण्यात आले आहेत.नव्या कारचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स


न्यू S90 B5 इन्स्क्रिप्शन (पेट्रोल माइल्ड-हायब्रिड)


न्यू XC60 B5 इन्स्क्रिप्शन (पेट्रोल माइल्ड-हायब्रिड)


क्षमता: 1969 cc

कमाल आउटपुट: 250 hp

कमाल टॉर्क: 350 Nm

ऑटोमॅटिक 8-स्पीड FWD (S90)

ऑटोमॅटिक 8-स्पीड AWD (XC60)

अॅडव्हान्स्ड एअर क्लीनकर PM 2.5 सेन्सरसह

गुगल सर्व्हिसेससह अँड्रॉइड पॉवर्ड इन्फोटेनमेंट सिस्टिम

अॅडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोल

पायलट असिस्ट

लेन राखण्यास मदत

क्रॉस ट्रॅफिक अलर्टसह ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टिम

धडक बसण्याला आळा घालणारा सपोर्ट (पुढील बाजूस)

धड बसण्याची चेतावनी देणारा आणि आळा घालणारा सपोर्ट (मागील बाजूस)

360 अंशातील कॅमेरा

पार्किंगसाठी मदत (पुढीलमागील आणि बाजूला)

 

भारतातील वॉल्वो कार


स्वीडिश लक्झरी कार कंपनी असलेल्या वॉल्वोची भारतात 2007 साली स्थापना झाली आणि त्यांनी या स्वीडिश ब्रँडचे मार्केटिंग देशात करण्यासाठी प्रचंड काम केले आहे.अहमदाबादबंगळुरूचंदीगडचेन्नईकोईमतूरदिल्ली एनसीआर - दक्षिण दिल्लीपश्चिम दिल्लीगुरगावहैदराबादइंदूररायपूरजयपूरकोचीकोझिकोडेकोलकातालखनौलुधियानापश्चिम मुंबईदक्षिण मुंबईपुणेरायपूरसूरतविशाखापट्टणम आणि विजयवाडा या ठिकाणी असलेल्या 24 डीलरशिपच्या माध्यमातून वॉल्वो कारतर्फे त्यांच्या प्रोडक्ट्सचे मार्केटिंग करण्यात येते.


Post a Comment

0 Comments