डोंबिवली ग्रामीण भागात कडकडीत बंद

 डोंबिवली ( शंकर जाधव ) लखिमपूर येथील शेतकरी बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनेजिल्हा सरचिटणीस अँड ब्रम्हा माळी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.           कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार देसलेपाडा गजनान चौक व नांदिवली परिसरामध्ये विभागातील कार्यकर्त्यांनी  ठिकठिकाणी निदर्शने करत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी व्यापारी आणि नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला.          त्यानंतर मानपाडा सर्कल येथे विधानसभा अध्यक्ष दत्ता वझे व गोळवली येथे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनीही अंदोलन केले. यावेळी गजानन पाटील, योगेश डांगे, वैभव माळी, स्वप्नील चौधरी, दिनेश हुलावले, अजिंक्य माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments