इंधन दरवाढी विरोधात युवासेनेचे डोंबिवलीत सायकल रॅली

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात रविवारी डोंबिवलीत युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.या सायकल रॅलीत प्रतिकात्मक  रावण आणि यमराज सहभागी झाले होते. रॅलीच्या वेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नारेबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे  रॅलीत ४२०  नंबरच्या गाडीला बैलजोडी लावण्यात  होती.


          तर काही कार्यकर्ते घोड्यावर सवार झाले होते. युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहरप्रमुख राजेश मोरे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर युवा सेनेच्या माध्यमातून महागाईला विरोध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना युवासेना डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखेकडून रॅलीला सुरुवात झाली.


             केंद्र सरकरने पेट्रोल दरवाढ आणि महागाई केलेल्या विरोधात `हेच का अच्छे दिन` असा भाजप सरकारला टोला लगावला. रॅलीत शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण जिल्हा युवा अधिकारी दीपेश म्हात्रे  ,उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, उप जिल्हाअधिकारी आशू सिंह ,राहूल म्हात्रे, सागर दुबे, युवासेना शहर अधिकारीसागर जेधे, अभिजित थरवळ,कविता गावंड, राहुल म्हात्रे,मुकेश भोईर,शाखाप्रमुख अजय घरत, प्रतिक पाटील , पवन म्हात्रे, अंकित जाधव , स्वप्निल विटकर, प्रतिक राणे, मयूर घोलप, योगेश म्हैसधूने, महेश अहिरे,, शिल्पा मोरे, निलम मांजरेकर यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.


            `सिर्फ थाली बजाओ टीन टीन टीन... कहा गये हो अच्छे दिन`, ` लाडू करंज्या चकली अच्छे दिनची फेकली`, 98..99...शंभर  महागाईत भाजपचा पहिला नंबर`, `डीजल पेट्रोल सौ के पार झुटा है मोदी सरकार`` मोदीजी हम किस किस से लढेंगे कोरोना से नही  मेहेंगाईसे मरेंगे`  `झुठे वादे झूठी थी कस्मे  सारेच खेळ तुझे रे फसवे` अश्या घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी दिपेश म्हात्रे म्हणाले, पेट्रोल दर ११५ रुपयांच्या पुढे गेले आहे.म्हणूचा मोदि सरकारला जागे करण्यासाठी अश्या प्रकारची  रॅली काढली. `हेच का अच्छे दिन` महाराष्ट्रातील तरुण मोदी सरकारला विचारत आहेत.


Post a Comment

0 Comments