नगरसेवक संतोष तरे यांनी केले स्वखर्चाने रस्त्याचे खडीकरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० टिटवाळा येथील नगरसेवक संतोष तरे यांनी स्वखर्चाने गणेश वाडीतील ५०० मीटर रस्त्याचे खडीकरण केले आहे.  टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरात जाणारा मुख्य रस्त्याची अवस्था पावसामुळे अत्यंत दयनिय झालेली होती.            याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक संतोष तरे यांच्याकडे रस्त्याबाबत गाऱ्हाणे मांडल्यावर त्यांनी लागलीच स्व खर्चातून ३०  मोठ्या गाड्या खडी टाकून या रस्त्याचे खडीकरण करून दिले. त्यामुळे ऐन नवरात्र, दसरा दिवाळीच्या सणासाठी तात्पुरत्या का होईना  नागरिकांना चालण्यापूरता रस्ता बनवून दिल्या बद्दल नागरिकांनी संतोष तरे यांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments