डेटा चोरी: असे करा आपल्या डेटाचे संरक्षण
■कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जग अधिकाधिक डिजिटल झाले आहे. लोक ऑनलाइन जास्त वेळ घालवत असून ईमेल आयडी, फोन नंबर, पासवर्ड, बँक तपशील इत्यादींसारखे त्यांचे वैयक्तिक तपशील संकेतस्थळावर आणि अॅपवर शेअर करतात ज्यामुळे डेटा चोरीची शक्यता वाढते.      आज, कंपन्या ग्राहकांसोबत घट्ट संबंध जोडण्यासाठी त्यांचा वैयक्तिक डेटा गोळा करतात. परंतु अलीकडील डेटा उल्लंघन स्पष्टपणे दर्शविते की ब्रँड वापरकर्त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे काम करत नाहीत, ज्यामुळे ग्राहकांना जास्त धोका आहे. जेव्हा क्विक हीलने अलीकडेच ग्राहकांच्या नवीन सुरक्षा चिंता समजून घेण्यासाठी सर्वेक्षण केले तेव्हा वापरकर्त्यांनी याविषयीची मोठी चिंता दर्शविली.            डेटा उल्लंघनामुळे संवेदनशील माहितीशी तडजोड करून व्यवसाय तसेच ग्राहकांना फटका बसला. ज्या व्यक्तीचा डेटा चोरीला गेला आहे, त्याच्यासाठी हल्लेखोर फिशिंग घोटाळे, बँक खाती हॅक करून, खात्याचा पासवर्ड बदलणे, डेटा चोरीला जाण्याच्या प्रकारानुसार पीडितेच्या नावावर बँक कर्ज मिळवू शकतो. म्हणूनच, ग्राहकांनी त्यांचा डेटा लीक झाला आहे की नाही हे तपासणे आणि परिणाम कमी करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना करणे महत्वाचे बनले आहे.        क्विक हील संशोधकांच्या मते, ब्रँड आणि व्यवसाय वैयक्तिकृत वापरकर्त्यांना अनुभव देण्यासाठी क्लाउड-आधारित तंत्रज्ञान स्वीकारत असल्याने त्यांनी हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की धोक्याचे घटक चोरीसाठी, विक्रीसाठी आणि चोरलेला ग्राहक डेटा खरेदी करण्यासाठी त्याच साधनांचा फायदा घेत आहेत.       क्विक हीलच्या मुख्य उत्पादन व्यवस्थापक स्नेहा काटकर म्हणाल्या, "वाढत्या डेटा उल्लंघनामुळे, आम्ही क्विक हील मध्ये डेटा ब्रीच अलर्टसारख्या नवीन गोपनीयता वैशिष्ट्यांचा समावेश करून आमच्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत झालो आहोत. हे ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक डेटाशी तडजोड केल्यास त्वरित सूचना देते आणि त्यानुसार सक्रियपणे त्यापासून बचावाच्या उपाय सुचवते.          गोपनीयतेवर आधारित दृष्टीकोनानंतर, आमच्या नवीनतम सुरक्षा उपायांमध्ये अँटी-ट्रॅकर, वेबकॅम संरक्षण, सुरक्षित बँकिंग आणि बरेच काही यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ग्राहक संरक्षण नेहमीच आमच्या कामकाजाचे पहिलं उद्दिष्ट आहे आणि आमचा ठाम विश्वास आहे की मजबूत सुरक्षा उत्पादनांसह आणि सोबतच जागरूकता वाढवून आपण आपल्या विकसित होत असलेल्या, तरुण ग्राहकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल विश्व तयार करू शकतो.


डेटा चोरीतून कसे वाचावे?


·         उल्लंघन केलेल्या साइट्ससाठी आपले पासवर्ड त्वरित बदला


·         सर्व ऑनलाइन खात्यांसाठी हटके पासवर्ड वापरा

·         आपल्या अकाऊंट लॉगिनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी साइन-अप करा


·         ईमेलमधील कोणत्याही संशयास्पद दुव्यापासून सावध रहा आणि अज्ञात साइट्स टाळा


·         क्विक हील टोटल सिक्युरिटीसारख्या मजबूत अँटीव्हायरस सोल्यूशनचा वापर करा. जर ग्राहकांच्या वैयक्तिक डेटाचा भंग केला गेला असेल आणि ऑनलाइन तडजोड केली गेली असेल तर त्यांना त्वरित सूचना दिल्या जाते आणि त्यानुसार त्यांना सुधारात्मक उपाय करण्यास मदत केली गेली जाते.

Post a Comment

0 Comments