लिव्हप्युअरचा फेस्टिव्ह सेल


■व्हाऊचर्स आणि मोफत भेटवस्तूं सोबत ५० टक्क्यां पर्यंतची सूट ~


मुंबई, २२ ऑक्टोबर २०२१ : वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर्स आणि नाविन्यपूर्ण निद्रा व निरामय जीवनशैलीच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी लिव्हप्युअर सणासुदीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक सेल घेऊन आली आहे. ३० ऑक्टोबर, २०२१ पर्यंत चालणऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना लिव्हप्युअर डॉटकॉमवर व्हाऊचर्स आणि मोफत भेटवस्तूंसोबत ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येईल. लिव्हप्युअर स्लीपवरही ग्राहकांना थेट २० टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे.         इतकेच नव्हे तर लिव्हप्युअर स्लीप एका भाग्यशाली विजेत्याला एक अत्याधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण लिव्हप्युअर एअर कंडिशनरही (एसी) भेट म्हणून देणार आहे. त्याची घोषणा ३१ ऑक्टोबर, २०२१ ला केली जाईल.           लिव्हप्युअरचे सीईओ प्रीतेश तलवार म्हणाले, यंदाच्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आपल्या घरांसाठी नवी आणि अत्याधुनिक गृहोपयोगी उपकरणे तसेच इतरही उत्पादनांच्या खरेदीची नामी संधी मिळणार आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात शिगेला पोहोचलेली खरेदीची तीव्र इच्छा आणि गेल्या २ वर्षांपासून साचून राहिलेली मागणी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे, या काळात वस्तूंच्या विक्रीत तडाखेबंद वाढ होण्याची आशा आम्हाला दिसून येत आहे.               आमच्या ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित करणे आणि त्याचे मूल्य वाढवण्यासाठी आम्ही यंदा आकर्षक ऑफर्सयुक्त आकर्षक सेल आणला आहे. त्यावर ग्राहकांच्या उड्या पडतील हे नक्कीच! गृहोपयोगी उपकरणे, वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर्स, मॅट्रेसेस, कम्फटर्स आदी आकर्षक किमतींवर उपलब्ध होत आहेत. या सेलचा जास्तीत जास्त लाभ उचलत आमच्या उत्पादनांच्या माध्यमातून जीवनशैलीला नवे परिमाण देण्यासाठी आम्ही ग्राहकांचे स्वागत करत आहोत."

Post a Comment

0 Comments