आजदे पाड्यात पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा या पारंपारिक खेळासाठी सर्वजण आतुरतेने वाट पहात असतात. गेले वर्ष पूर्णपणे कोरोनात गेले, यावर्षी तरी आनंद घेता येईल असे सर्वांनाच वाटत होते. पण कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झाला नसल्याने फक्त देवीची पूजा आणि दर्शन तेही नियम अटी पाळून आजदेपाड्यात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतींत सुरू झाला.           मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष जनार्दन काळण यांनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली असून नवरात्रोत्सव साजरा केला आहे. रोज संध्याकाळी देवीची आरती आणि पूजाअर्चा असा साधा कार्यक्रम होत आहे. प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात गरबा आणि दांडिया व विविध कार्यक्रमसह बक्षिसांची रेलचेल मंडळ करीत असते. पण यावर्षी काहीही नाही. सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होतआहे.               कोरोना महामारीमुळे यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करताना कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा न ठेवता अगदी साधेपणाने उत्सव साजरा करीत आहोत. तसेच कोरोना महामारीच्या संकटातून जगाची सुटका व्हावी अशी प्रार्थना आम्ही माता जगदंबेच्या चरणी करतो. सर्वांना सुंदर असे आरोग्य व उदंड आयुष्य मिळो असेही गाऱ्हाणे देवीसमोर घालत आहोत असे वक्तव्य साईराज मित्र मंडळ अध्यक्ष जनार्दन काळण यांनी केले.

Post a Comment

0 Comments