खेळाडूंना दहावी व बारावी सवलतीचे गुण मिळाले पाहिजे - नामदेव शिरगावकर


■कल्याण मधील सन्मान महाराष्ट्राचा गौरव क्रीडा क्षेत्राचा या कार्यक्रमात अनेक क्रीडा दिग्गज यांची उपस्थिती..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स़घटनांनी एकत्र येऊनमहाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार व क्रीडा चर्चासत्र सोमवारी के. सी. गांधी शाळेच्या बंदिस्त सभागृहात 'सन्मान महाराष्ट्राचा! गौरव क्रीडा क्षेत्राचा!!हा सत्कार सोहळा व 'महाराष्ट्राचे बदलते क्रीडा धोरणया विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील शासनमान्य क्रीडा संघटनांचे निवडक प्रतिनिधीशाळा व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव व भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उपाध्यक्ष संजय शेट्येखजिनदार धनंजय भोसलेसहसचिव दयानंद कुमारसदस्य राजेंद्र घुलेराजेंद्र कोळीदीपक मेजारीनिलेश जगतापस्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विजय संतानटोकियो ऑलिंपिक चे निरिक्षक अशोक दुधारेक्रीडा संघटक सुनिल पूर्णपात्रेमहेंद्र मोकाशी या मान्यवरांचा भव्य सत्कार स्वागत समितीच्या माध्यमातून करण्यात आला. विशेष उपस्थिती म्हणुन ठाणे जिल्हा फुटबॉल,  संघटनेचे अध्यक्ष व आमदार गणपत गायकवाड व महाराष्ट्र क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष व मा. आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.सचिव नामदेव शिरगावकर यांनी खेळाच्या विकासासाठीखेळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच खेळाच्या साधनसामग्री खेळाडूंना उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन कटिबद्ध राहिलंठाणे जिल्ह्यात तायक्वांडो खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन सहकार्य करण्यासाठी तयार आहे तसे्च खेळाडूंना दहावी आणि बारावी चे सवलतीचे गुण मिळाले पाहिजे तसेच नोकरीतील आरक्षण या मुद्यांवर क्रीडा धोरणात मार्गदर्शक तत्वांवर निश्चित विचार करण्यात येईल याची शाश्वती दिली.सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष प्रा. उदय नाईककार्यवाह लक्ष्मण इंगळेसहकार्यवाह संतोष पाठकग्लोबल महाविद्यालयाच्या प्राचार्या सुप्रिया नाईकरउमेश काळेमहादेव क्षीरसागरकृष्णा माळीअशोक घोडके यांनी मेहनत घेतली. तर स्वागत समितीचे संयोजक शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments