Header AD

पाईपलाईन फुटल्यामुळे कल्याण -शिळ रोड जलमय

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) एमआयडीसीची मोठी जलवाहिनी शनिवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास  फुटल्यामुळे  कल्याण - शिळ रोड जलमय झाला होता.यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.
                गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण शिळ रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज सकाळी देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. ज्याठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. त्या परिसरात  पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. एवढ्या प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. 
               कल्याण शिळ मार्गावर पाणी आल्यामुळे वाहनांना त्यातूनच वाट काढावी लागली. या घटनेमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली.दरम्यान वारंवार घडणाऱ्या या जलवाहिनी फुटण्याच्या घटना थांबणार तरी कधी असा  संतप्त प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
पाईपलाईन फुटल्यामुळे कल्याण -शिळ रोड जलमय पाईपलाईन फुटल्यामुळे कल्याण -शिळ रोड  जलमय Reviewed by News1 Marathi on October 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads