कचोरे प्रभागातील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटच्या कामाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ


■सिमेंट काँक्रीटी करणासाठी खासदारांनी दिला २० लाखांचा निधी...


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व येथील प्रभाग क्र. ४५ कचोरे येथील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटच्या कामाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी खासदारांनी २० लाखांचा निधी दिला असून याबाबत परिवहन समिती सभापती तथा शिवसेना उपशहर संघटक मनोज चौधरी यांनी खासदारांकडे पाठपुरावा केला होता.



       कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील सदानंद चौधरी यांच्या घरापासुन ते विनायक चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता बनविणे आवश्यक होते. यासाठी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. खासदारांनी देखील या कामासाठी निधी देत कामाला मंजुरी दिली. 



       त्यानुसार या रस्त्याच्या कामाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, नगरसेवक दिपेश म्हात्रे, कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, उपशहर अधिकारी कमलाकर चौधरी, शाखा प्रमुख हरीश्चंद्र म्हात्रे, स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.  




   खासदारांनी रस्त्याच्या कामासाठी २० लाखांचा निधी दिल्याबद्दल मनोज चौधरी यांनी खासदारांचे आभार मानले असून कचोरे येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी ६० लाखांचा निधी देखील दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. तर स्थानिक स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी देखील खासदारांचे आभार मानत या कामासाठी आपण देखील पाठपुरावा केल्याचे सांगितले.   

Post a Comment

0 Comments