नवरात्री उत्सवात फुले २० टक्क्यांनी महागली

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : घटस्थापनेसाठी महत्वाच्या असलेल्या फुलांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नवरात्रीच्या दिवसांत  झेंडूच्या फुलाना मोठी मागणी असते. गतवर्षी पेक्षा यंदा झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तरी गणेशोत्सवा दरम्यान भाव खाऊन गेलेला फुलांचा बाजार पितृपंधारवडात फुलांचा भाव खाली घसरला होता. 

            यंदा फुलांची आवक वाढल्याने सणासुधीच्या काळात फुलांचा बाजार वीस टक्के वाढले असालयाचे कृषि उत्पन्न बाजार समिती सहसचिव दयानंद पाटील यांनी सांगितले. तर दासऱ्याच्या दिवशी फुलांचा भाव वाढेल की तसंच राहील याकडे सर्वा ग्राहकांचे लक्ष लागले आहे.  
       सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलाना आणि इतर फुलाना बाजारपेठेत मोठी मागणी असते. नवरात्रीत झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. गतवर्षी कोरोंनाचा प्रादुर्भाव असल्याने फुलांची आवक कमी झाली होती. गत वर्षाच्या नावरात्री उत्सवाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फुलांचा भाव २० टक्यांनी वाढला आहे. 

           असे असले तरी गणेशोत्सवा दरम्यान ४०० रुपये किलोने विकली गेलेली गुलछडी पितृपक्षात ३५ रुपयांवर आली आहे. गणेशोत्सवा दरम्यान वाढलेले फुलांचे भाव नवरात्रीआधी उतरले आहेत. मात्र हेच फुलांचे भाव दसऱ्याच्या दिवशी नक्कीच वाढतील अशी माहिती किरकोळ विक्रेते यांनी दिली. 

        कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आळे फाटाबनकर फाटाजुन्नरनाशिकसिन्नरनगरपुणे आदी भागातून फुलांची आवक होते. तसेच पालघर जिल्ह्यातून वाडामोखाडाविक्रमगड येथून मोगऱ्याच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. आजच्या दिवस भरात एकूण २ ट्रक१०० टेम्पो १३३० क्विंटल फुलांची आवक झाली.
लांबून विक्रीसाठी आलेल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. ग्राहकांसाठी पार्किंग उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी कोरोंना नियमांचे  पालन करण्यासाठी उपयोजना करण्याचे प्रशासनाला सांगितले असल्याचे कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले.पितृपंधारवड्यात फुलाच्या विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद नव्हता. नवरात्र उत्सवामुळे फुलांच्या विक्रीला ग्राहक वर्ग मिळेल. तसेच समितीने ग्राहकांसाठी पार्किंगबॅरिगेटसनिटायझरची व्यवस्था केली असलेचे फूल विक्रेते भाऊ नरवडे आणि बजरंग हुलावले यांनी सांगितले.     


 

सध्या स्थितीतील भाव  

झेंडू – ४० रुपये किलो

अष्टर – ६० रुपये किलो

काकडा – ४० रुपये किलो

लिली – ६० रुपये जुडी

गुलाब – ४० रुपये जुडी

शेवंती – ४० रुपये किलो

मोगरा – २०० रुपये किलो

गुलछडी – १२० ते २०० रुपये जुडी

Post a Comment

0 Comments