फॅशन चाहत्यांना मिळणार लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होण्याची संधी■ट्रेलचा उपक्रम; 'ट्रेललॅक्मेफॅशनवीक' चॅलेंजची केली घोषणा ~


मुंबई, १ ऑक्टोबर २०२१: भारतातील सर्वात मोठे सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेल ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी हंगामासाठी अधिकृत जीवनशैली भागीदार म्हणून एफडीसीआय एक्स लॅक्मे फॅशन वीक सोबत सहभागी आहे. उत्पादकांच्या प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ट्रेलने विशेष 'ट्रेललॅक्मेफॅशनवीक' चॅलेंजची केली घोषणा केली आहे. ट्रेल भारतातील २० फॅशन चाहत्यांची निवड करेल जे मुंबईत आयोजित आगामी लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होऊ शकतील. १ ऑक्टोबर रोजी सुरू होणारी ही स्पर्धा ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहील.        या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्यात दडलेला फॅशनप्रेमी ट्रेल कॅमेऱ्यासमोर व्यक्त होत चमकावावा लागेल. मग ते तुमचं रॅम्प वॉक असो, एक अद्वितीय डिझाइन सौंदर्य असो किंवा #ओओटीडी पुढचा ट्रेंड असो, फॅशनच्या उद्योगातील सर्वोत्कृष्ट आतंरजाळ तयार करण्याची संधी ट्रेल या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे.        फॅशन चाहत्यांनी #ट्रेललॅक्मेफॅशनवीक हॅशटॅग वापरून आणि पोस्टमध्ये @ट्रेल.कम्युनिटी आणि @ट्रेललॅक्मेफॅशनवीक टॅग करून ट्रेल हँडल तसेच त्यांच्या वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच लॅक्मे फॅशन वीक मुंबईचे तिकीट जिंकण्यास आणि या समुदायात जोडण्यात ते का पात्र आहेत याची संपूर्ण माहिती स्पर्धकांनी व्हिडिओत दर्शवली पाहिजे. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ट्रेल अॅपवर विजेत्यांची घोषणा केली जाईल.

Post a Comment

0 Comments