भिवंडीत चोर समजून तरुणांची हत्या,9 जणांवर गुन्हा दाखल.

भिवंडी दि 12 (प्रतिनिधी ) शहरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनिसूरत कंपाऊंडमध्ये चोर समजून एका तरुणांची बेदम  मारहाण करून हत्या केल्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात 9 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.         रमेश मुरली शर्मा ( वय 25)असे हत्या झालेल्या युवकांचे नाव असून तो साई नगर ठाणे येथील राहणारा असून त्याचे मुळगाव  उत्तरप्रदेशातील चारीगाव आहे तो शनिवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास अंजूरफाटा येथील मनिसूरत कंपाऊंड मधील महालक्ष्मी एम.एस.स्कैप ट्रेडर्स मधील 9  भंगार व्यवसायिकांनी  त्याला चोर समजून लाकडी मारदांड्याने  बेदम मारहाण केली त्यात त्याचा जागीच  मृत्यू झाला .
           याची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शव विच्छेदणासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून शिवपुजन  गुप्ता, पिंटू  गुप्ता, पंचगुलाम  गुप्ता, शिवकुमार  वर्मा,पवनकुमार  मिश्रा,देवीप्रसाद  वर्मा,बाबुलाल  गौतम, जगदीश  गौतम, रामभरोस  निशाद  यांच्या विरोधात   भादंवि कलम 302 ,34 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामधील 8 जणांना अटक करण्यात आली असून रामभरोस   निशाद हा फरार झाल्याने त्याचा शोध सुरु आहे, या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस  निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस  निरीक्षक राउत करीत आहे.

Post a Comment

0 Comments