भिवंडी भूषण स्व. काकासाहेब पवार यांच्या 82 व्या जयंती निमित्त आरोग्य ,रक्तदान शिबिराचे आयोजन..

भिवंडी :दि.04 (प्रतिनिधी )  शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सदैव मदतीचा हात देण्याने दानशूर व्यक्तिमत्व भिवंडी भूषण कै रंगराव विठोबा उर्फ काकासाहेब पवार यांच्या 82 व्या जयंती निमित्त साईनाथ पवार यांच्या वतीने रक्तदान ,नेत्र चिकित्सा,जनरल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कामतघर येथील विद्यालयात करण्यात येऊन त्यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.          साईनाथ पवार यांनी आपल्या वडिलांच्या जयंती निमित्त कोणत्याही धार्मिक कार्याचे आयोजन न करता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळवून दिला बद्दल शिवसेना भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने यांनी साईनाथ पवार यांचे अभिनंदन करीत कै काकासाहेब पवार यांचा दातृत्वशीलतेचा वारसा पुढे चालवावा अशा शुभेच्छा दिल्या .
            या प्रसंगी आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी,समाजसेवक नानजीभाई ठक्कर ,नगरसेवक मनोज काटेकर,निलेश चौधरी ,अरुण राऊत ,
सुमित पाटील,नित्यानंद नाडार, अशोक भोसले यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. या जयंती कार्यकटम दरम्यान कोरोना काळात सेवा बजावणारे डॉक्टर,सफाई कामगार ,कोव्हिडं केंद्रात सेवा बजावणारे स्वच्छता कर्मचारी ,डॉक्टर परिचारक, स्वयंसेवी संस्था यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
            तर कोरोना मुळे मृत्यू ओढवलेल्या व बेरोजगार झालेल्या कुटुंबियांना स्वयंरोजगारा साठी पन्नास एम्ब्रॉयडरी मशीन वितरीत करण्यात आल्या आहेत.या कार्यक्रमा दरम्यान अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून नेत्र व जनरल चिकित्सा शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषध वितरीत करण्यात आली .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  स्व काकासाहेब पवार विद्यालयाचे शिक्षकवृंद यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments