भिवंडी गोदाम पट्ट्यात घरफोडी करणाऱ्या पाच गुन्ह्यांची उकल करून 64 लाखांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात नारपोली पोलिसांना यश

भिवंडी दि 1 (प्रतिनिधी )  तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाया फोफावल्याने या भागात चोरी सह घरफोडीच्या घटना सुध्दा मोठ्याप्रमाणात होत असताना मागील दोन महिन्यात झालेल्या गोदामातील पाच घरफोडी च्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात नारपोली पोलिसांना यश आले असून पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिसांनी विविध भागातून अटक केलेल्या एकूण आठ आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून 14 लाख 73 हजार किमतीची तांब्याची तार,झिंक [ जस्त ] धातू ,16 लाख किमतीचे शर्ट, 16 लाख किमतीचे कपड्याचे रोल,15 लाख किमतीच्या कॉपर ट्यूब असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे .

Post a Comment

0 Comments