भिवंडीत लुटमार करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला अटक,

 
भिवंडी दि 20  (प्रतिनिधी ) तालुक्यातील  पिंपळास  पाईपलाइन मार्गे  मध्यरात्रीचा वेळी ठाण्याकडे जाणाऱ्या मोटर कार रस्त्यावर अडवून महिला प्रवाशांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत सुमारे 83 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल फोन ची लूटमार करणाऱ्या त्रिकुटासह 5 जणांचा अट्टल टोळीला कोनगाव पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. 
           फिर्यादी दर्शील हितेश गुटका ( 27 रा.पाचपाखडी ठाणे  )या आपल्या मैत्रिणीसोबत  भिवंडीत काही कामानिमित्त आल्या होत्या.रात्री भिवंडी जवळील पिंपळास पाईपलाईन रोडने ठाणे कडे घरी जात असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन इसमांनी त्यांची गाडी रस्त्यावर अडवून अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली.यावेळी त्यांनी प्रतिकार करतात चोरट्यांनी लाकडी दांड्याने  दशिँला व तिच्या मैत्रिणी मारहाण केली आणि अंगावरील सोन्याची चैन, हातातील अंगठी व मोबाईल फोन असा एकूण 83 हजार रुपये किमतीचा ऐवज पळून नेला.
            यासंदर्भात गुन्हा दाखल होताच कोनगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, पो नि.गुन्हे राजेंद्र पवार यांचे पोलीस पथकाने तांत्रिक तपासाद्वारे तपास करून आरोपी अब्दुल कादिर अ. शेख (वय 24) उमर अ. रहमान मंसुरी (वय 24) निहाल नजीर शेख (23 रा.सर्व कल्याण ) या तिघांना अटक केली अधिक चौकशीअंती या तिघा आरोपींनी चोरी केलेला माल आकाश राजेश कंडारे  (24 कल्याण) सलमान नजीब मजित शेख (27 मुंब्रा ठाणे) यांना विक्री केल्याचे सांगितले. 
            त्यामुळे तपास करी पाचही आरोपींना अटक केली आहे.सदर आरोपींकडून मोबाईल फोन सह सोन्याचे दागिने,गुन्हयातील वापरलेली मोटर सायकल असा एकूण सुमारे एक लाख 33 हजार रुपये किमतीचे ऐवज व माल जप्त केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक पिंगळे,सपोनि किरणकुमार वाघ करीत आहेत.

Post a Comment

0 Comments