भिवंडी तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या 5 हजार 717 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष 5 कोटी निधीचे वितरण..

भिवंडी दि 27 (प्रतिनिधी )16 ते 21 जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण  झाली असताना भिवंडी तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले असताना शासनाने प्रति कुटुंब 10 हजार प्रमाणे तब्बल 10 कोटी 27 लाख 77 हजार 700 रुपयांचा निधी शासना कडून मंजूर करण्यात आला असून नुकताच आमदार शांताराम मोरे यांच्या शुभहस्ते तहसीलदार अधिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले .
          या पुरामुळे अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांनी शासना कडे मदतीची याचना केली होती त्यानुसार भिवंडी तालुक्यातील  घर,गोठे , झोपड्या,
दुकानदार, टपरीधारक, तसेच कुक्कुटपालन शेड अशा तब्बल 8863 पंचनामे करून शासना कडे पाठविले असता शासनाने 10 कोटी 27 लाख 77 हजर 700 रुपयांची मदत केली असून 5 हजार 717  नुकसानग्रस्तांचे बँक अकाऊंड प्राप्त झाल्याने 5 कोटी 25 लाख 47 हजार 75 रुपयांची मदत बँक खात्यात परस्पर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे .दिवाळी तोंडावर आली असताना शासनाने मदत दिल्याने नुकसानग्रस्त नागरीकांनी  समाधान  व्यक्त केले आहे .

Post a Comment

0 Comments