भिवंडीत तिघा जणांच्या मुसक्या आवळत 12 घरफोडी ,दुचाकी चोरी गुन्ह्यांची शांतीनगर पोलिसांनी केली उकल ,19 लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी दि 13(प्रतिनिधी ) पोलीस उपायुक्त कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांच्या घटनां मध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलिसांनी तिघा आरोपींच्या मुसक्या आवळत 12 घरफोडी सह दुचाकी चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करीत त्यांच्या जवळून  सुमारे 37 तोळे सोन्याचे दागिने व चार दुचाकी असा 19 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .          वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  पथक घरफोडी च्या दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नदिम मोहम्मद खान वय 18 याचे नाव समोर आले असता तो निजमपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारागृहात असल्याने न्यायालयाच्या परवानगीने त्याचा ताबा घेऊन कसून चौकशी केली असता त्याने शांतीनगर पो ठाणे क्षेत्रातील अकरा घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे 
         तर दुसरा आरोपी आयुब युसूफ शेख यास ताब्यात घेऊन यांच्या कडून एकूण 12 घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करीत एकूण 371 ग्रॅम सोन्याचे दागिने,750 ग्राम चांदीचे दागिने असा 17 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .तर शौकतअली अन्सारी यास ताब्यात घेत चार दुचाकी ,एक ऑटो रिक्षा असा 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण तिन्ही गुन्ह्यात 19 लाख 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

Post a Comment

0 Comments