ब्राह्मण समाजाने केंद्र सरकार च्या 10 टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा


■ब्राह्मण समाजातर्फे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा समाजश्री पुरस्काराने गौरव , मुंबई महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजातील इच्छुकांना रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देणार....


 मुंबई दि.6 : -  दलितांना आरक्षण मिळते मात्र आम्हाला  आरक्षण मिळत नाही अशी भावना ब्राह्मण मराठा सवर्ण जातींमध्ये होती. त्या कारणानेही दलितांवर अत्याचार होत होते. त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि सवर्णांमधील गरिबांना ज्याचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आता आहे या आर्थिक निकषावर आरक्षण  द्यावे अशी मी सर्वात आधी मागणी केली होती.        सर्वच ब्राह्मण श्रीमंत नाहीत. ब्राह्मणांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सवर्णांमधील गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरी मध्ये 10 टक्के सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकार चा  कायदा 3 वर्षांपूर्वी केला आहे.त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातील गरिबांनी घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.          ब्राम्हण समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे आणि मुंबईत परप्रांतीयांना संविधानाचे संरक्षण मिळवून देणारे संघर्षनायक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा ब्राम्हण समाजातर्फे समाज श्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.      ताज महाल हॉटेल च्या बॉल रूम मध्ये  ब्राह्मण एकता मंच; परमार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्यास ना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीतील खुसखुशीत भाषणाने  सत्काराला उत्तर दिले. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते ब्राम्हण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.        आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ब्राह्मण समाजातील उमेदवारांना  5 जागांवर रिपाइं ची उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी ना. रामदास आठवले यांनी केली.

  


          उत्तर प्रदेशातून ब्राम्हण आणि सर्व जाती चे लोक मुंबईत येऊन राहिले. मिळेल ते काम करून कष्ट करीत राहिले. त्यातील काही लोक व्यापारी बिल्डर उद्योजक आणि काही उच्च शिक्षित झाले. मात्र मध्यंतरी मुंबईत काही लोकांनी उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी धमकी दिली. तेंव्हा सर्वात आधी माझ्या रिपब्लिकन पक्षाने ईट का जवाब पत्थरसे देंगे असा प्रति ईशारा देऊन उत्तर प्रदेशातुन मुंबईत आलेल्या  बांधावांना  पाठिंबा दिला होता याची आठवण यावेळी ना रामदास आठवले यांनी केली.         महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात कुठेही उद्योग धंदा नोकरी आणि वास्तव्य करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या ब्राम्हण आणि सर्व जातींना मुंबईत राहण्याचा अधिकार आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.           महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही. ब्राह्मण आणि सवर्ण समाजातील ज्या लोकांच्या मनात जातीभेदाचा विचार आहे तो विचार त्यांचे प्रबोधन करून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून आज ब्राम्हण समाजातर्फे सत्कार स्वीकारताना सर्व समाजात परिवर्तन होत असल्याचा विश्वास वाटत आहे. दलित सवर्ण ब्राम्हण यांतील सामाजिक भेदभाव मिटत आहे. समाजात एकोपा निर्माण होईल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित होईल त्या दिशेने आपली वाटचाल असावी असे आवाहन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले. 


ब्राह्मनोने देश को जगा दिया है 


और नरेंद्र मोदी ने चीन पाकिस्तान को भगा दिया है 


बहुत सारे लोगोको हो रही है जलन 


क्यों की आरपीआय मे शामिल हुये है शुक्ला कृष्णमिलन 


अशी कविता सादर करून ना रामदास आठवले यांनी 


सभागृहात हास्याची कारंजी  फुलविली. 


यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला;  ब्राम्हण एकता मंच चे अध्यक्ष शंभुनाथ मिश्रा; परमार्थ ट्रस्ट चे अध्यक्ष बद्रीप्रसाद पांडे; रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास तायडे; संजय भिडे; ब्रिजमोहन पांडे; अशोक पांडे; प्रेमकुमार पांडे; सुरेश मिश्रा ; कमलाकर मिश्रा; अनिल शुक्ला; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments