कोलशेवाडी पोलिस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात नाकाबंदी दरम्यान दुचाकी स्वाराच्या डोक्यात काठीने मारलं




कल्याण, कुणाल  म्हात्रे  वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असणारे कोळसेवाडी पोलिस ठाणे पुन्हा एकदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नाका-बंदी दरम्यान दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर  पोलीस कर्मचाऱ्याने काठीने मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 



            जखमी तरुणाचे नाव निलेश कदम असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान विनाकारण मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.



  कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात राहणारे निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोलशेवाडी पोलिसांची चेकिंग  सुरू होती. निलेश व भुपेंद्र जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले. 



ही काठी निलेश च्या डोक्याला लागल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यास गेलो असता पोलिसांनी नोंद करून घेतली नाहीतुमच्या उपचाराचा खर्च करतो विषय वाढवू नका असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.



या प्रकरणी पोलिसांनी मात्र चुप्पी साधली असून याबाबत बोलण्यास नकार दिल आहे. दरम्यान कल्याण पुर्वेकडील कोलशेवाडी पोलीस ठाणे  त्यांच्या वादग्रस्त  कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असते आता या प्रकरणामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Post a Comment

0 Comments