डोंबिवली ग्रामीण विभागात लसीकरणा साठी महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद


 
डोंबिवली ( शंकर जाधव ) `आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित`अश्या भूमिकेत असणाऱ्या महिला करोना प्रतिबंधक लस घेण्यास पुढे असल्याचे दिसते. डोंबिवली ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येत जास्तीत जास्त महिला वर्गानी लस घेतली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील डोंबिवली ग्रामीण भागातील सागाव येथील लसीकरण शिबिरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.

          या केंद्रातहि महिलांचा उत्साह चांगला होता. शिवसेना कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे व माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांच्या सहकार्याने सांगाव येथील डॉन बॉस्को शाळेत लसीकरण शिबीर घेण्यात आले .डोंबिवली ग्रामीण भागाची लोकसंख्या सुमारे १२ लाखाच्या आसपास आहे.५ लाखापेक्षा जास्त नागरिकांनि दुसरा डोस घेतला असून पहिला डोस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी होत असल्याचे दिसते. 

         महापालिकेच्या माध्यमातून सांगाव येथे कोविड प्रतिबंध लसीकरण शिबिर मंगळवारी घेण्यात आले. या शिबिरात महिलांची उत्फूर्त प्रतिसाद दिसून आला.उपस्थिती मोठी होती. शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम घेण्यात आली. यावेळी प्रकाश म्हात्रे म्हणालेपूर्वी ग्रामीण विभागात लसीकरणासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यानी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे ग्रामीण विभागात लसीकरणसाठी पाठपुरावा केला. 

          तसेच प्रभागातील नगरसेवकांनी खासदारांशी सतत संपर्क ठेवल्यांने प्रभागात लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली.यामुळे लसीकरणाचा वेग वाढला. म्हणजे महिला लसीकरणासाठी पुढे येत असून त्यांचा उत्साह मोठा आहे. यावेळी प्रभागातील ग्राफीक डिझायनर जयश्री फुलपगार म्हणाल्याप्रत्येक घरातील प्रत्येक महिलांनी लसीकरण करून घेतले पाहिजे. 

            माझे लसीकरण झाले आहे तुमचे झाले नसेल तर तात्काळ लसीकरण करून घ्या. तर नगरसेविका प्रेमा म्हात्रे म्हणाल्यामहिला लसीकरणासाठी मोठ्या संख्येने आल्या आहेत हा सर्वांसाठी चांगला संदेश आहे. ग्रामीण विभागातील महिलांना लसीकरणाचे महत्त्व समजले आहे.

Post a Comment

0 Comments