राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची ठाणे महापालिकेस भेट

 

■महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा घेतला आढावा...


ठाणे ,  प्रतिनिधी   :  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी. वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.


        

            राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त  संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अश्विनी वाघमळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रशांत रसाळ, स्वीय सहाय्यक श्री. गिरिधरनाथ, संपर्क अधिकारी अनिल सानप, उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता भारत भिवापूरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सूर्यवंशी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, कार्मिक अधिकारी जी.जी.गोदापुरे आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.       ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिःसारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या आदीबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सविस्तर माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्याना माहिती दिली.       दरम्यान ठाणे महापालिकेच्यातीने सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.      यावेळी सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य ठिकवून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.  तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सुविधेबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना डॉ.पी.पी.वावा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. Post a Comment

0 Comments