कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वतीने डोंबिवली सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध कोळसे वाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत दिले निवेदन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. आज कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या वतीने कोळसेवाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत निदर्शने करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.          आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा आणि शक्ती कायद्याची तातडीने अमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर विक्रम तरे, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, माजी नगरसेविका मोनाली तरे, वंदना मोरे, अॅड. राखी बारोद, नितेश म्हात्रे, गुडू खान, अरुण दिघे, पांडुरंग भोसले आदी पदाधिकारी आणि महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.       राज्यभरात महिलांवरील अत्याचार वाढत असताना राज्य सरकार केवळ गुन्ह्यांची संख्या मोजण्यात व्यस्त आहे. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर शक्ती कायद्याची तातडीने अमलबजावणी करण्याचे अश्वासन सरकारने दिले असले तरी शक्ती कायदा तयार करण्याची प्रक्रिया खोळंबली असून कायदा लवकरात लवकर लागू केला गेल्यास कायद्याच्या आधारे अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाई करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे शहरातील वाढणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली


Post a Comment

0 Comments