कल्याण मध्ये रक्त दात्यास मिळणार ५ लाखांचा मोफत विमा कल्याण पश्चिमेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण शहरांत येत्या शनिवारी २५ सप्टेंबर रोजी तिरंगा जागृती विचार मंचहर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि टिम परिवर्तनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५ लाख रुपयांचा विमा देखील विनाशुल्क देण्यात येणार आहे.हे रक्तदान शिबीर तिरंगा जागृती विचार मंचचेतन म्हामुणकर यांचे जनसंपर्क कार्यालयगाळा नं ०२ स्वानंद कॉलनीकनकावती बिल्डिंग समोररामबाग लेन नंबर ४कल्याण पश्चिम येथे सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत होणार आहे. जास्तीत जास्त रक्तदान करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन तिरंगा जागृती विचार मंच चे संस्थापक सचिन यादवडे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments