जोखमीच्या मालमत्तांच्या वाढत्या मागणीने तेलाच्या किंमतींना आधार
मुंबई, २४ सप्टेंबर २०२१  : गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूड सुमारे १.५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७३.३ डॉलरवर बंद झाल्या कारण पुरवठ्याची चिंता दृढ झाली, अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या सूची कमी झाल्या आणि जोखमीच्या मालमत्तेच्या मागणीत वाढ झाली.


           एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, पुढील काही महिन्यांत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आक्रमक दृष्टीकोनाची शक्यता असूनही बाजारपेठेतील पुनरुज्जीवनाची भूक आणि कमकुवत अमेरिकन डॉलरने तेलाच्या किंमतींना आधार दिला.         ऊर्जा माहिती प्रशासनाच्या अहवालानुसार, १७ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकन क्रूडच्या सूचीत ३.५ दशलक्ष बॅरलची घट झाली आणि बाजारातील ३.३ दशलक्ष बॅरल च्या घसरणीच्या अपेक्षेला मागे टाकले. अमेरिकेच्या खाडी किनारपट्टीवरील कच्च्या तेलाच्या ठिकाणी दोन चक्रीवादळांनी माघार घेतल्याने अमेरिकेच्या शुद्धीकरण मोहिमेला हळूहळू पुन्हा गती मिळाली. अमेरिकेच्या कच्च्या तेलाची सूची सुमारे ३ वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे.        अमेरिकेन मध्यवर्ती बँकेच्या विस्तार योजना अपेक्षेपेक्षा लवकर आटोपल्याने तेलाच्या किंमतींनी भार तोलला. परंतु,स्थिर पुरवठा आणि कमी होत असलेल्या अमेरिकन क्रूड स्टॉक्समुळे काही समर्थन मिळण्याची रास्त अपेक्षा आहे.        सोने: गुरुवारी स्पॉट गोल्ड १.३ टक्क्यांहून अधिक घसरून प्रति औंस १७४२.६ डॉलरवर बंद झाला. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने नुकत्याच झालेल्या बैठकीत हे धोरण बदलले नसले, तरी अपेक्षेपेक्षा लवकर आर्थिक पाठबळ काढून घेण्याची योजनेचा स्पॉट सोन्याच्या किंमतींवर परिणाम दिसून आला. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी नमूद केले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होत राहिल्यास ते येत्या वर्षात व्याजदरात वाढ करू शकतात. व्याजदर वाढल्यास सराफामध्ये गुंतवणुकीच्या संधीकडे कल वाढेल.       बेरोजगारांसाठीचा भत्ता मिळावा यासाठी अमेरिकन नागरिकांची संख्या अनपेक्षित वाढल्याचा परिणामी अमेरिकन डॉलर वधारल्या गेला तर सोन्यातील घसरण मर्यादीत राहिली. चीनच्या मालमत्ता विकासक एव्हरग्रांडेच्या जागतिक अर्थव्यवस्थेवरील कर्जसंकटाबाबत कंपनीने कर्जरोख्यांवरील व्याजातून परतफेडीच्या घोषणेसह जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी झाल्यानंतर सोन्यावरही काही दबाव जाणवला. यूएस फेडने धोरणात बदल केला नसला तरी पुढील काही महिन्यांत आक्रमक दृष्टिकोनामुळे संकेत कदाचित सोन्याच्या किंमतींवर अवलंबून राहतील.

Post a Comment

0 Comments