रिलायन्स जीओ कडून ११ कोटी मालमत्ता कर जमा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : रिलायन्स जीओ कडून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला ११ कोटी मालमत्ता कर जमा करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरणा-या करदात्यास मालमत्ता करात ५ टक्के सवलत देण्यात आली होती.              या मोहिमेस करदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून या कालावधीत नागरीकांनी १६०.६४  कोटी रूपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत केला आहे. गेल्यावर्षी  याच कालावधीत ११०.२२ कोटी रक्कम मालमत्ता करापोटी महापालिकेकडे जमा झाली होती.महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसूलीचा धडाका पूढेही सूरू ठेवला असून रिलायन्स जिओच्या नव्याने कर निर्धारण केलेल्या मोबाईल टॉवर्सचे मालमत्ता करापोटी ११ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी  धनादेश रिलायन्स जिओचे मॅनेजर यांनी आज महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचेकडे सूपूर्द केले.हि वसूली आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (कर) विनय कुलकर्णी यांनी केली असून यापुढील मालमत्ता कर वसूलीकामी कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मोबाईल टॉवरचे परवानगी व इतर समस्या निराकरणाकरीता पुढील आठवडयात सर्व संबधितांची बैठक घेवून समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले असून मालमत्ता कर विहित वेळेत जमा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.

Post a Comment

0 Comments