नोकरीचे आमिष दाखवून लूटमार करत बेरोजगाराची हत्या ४ आरोपींना मानपाडा पोलिसांनी केली अटक
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नोकरीचे आमिष दाखवून लूटमार करत बेरोजगाराची हत्या झाल्याची घटना डोंबिवली नजीकच्या खंबाळ पाडा येथे घडली होती. या प्रकरणी ४ आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर जवळ कृष्णमोहन  तिवारी या व्यक्तीवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना शनिवारी घडली होती. वाहतूक पोलिसांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी तरुणाला डोंबिवलीतील शिवम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तरुणाच्या हातावर व डोक्यावर जबर मारहाण केल्याने उपचार दरम्यान तरुणाचा मृत्य झाला. यामुळे मानपाडा पोलिसांकडून ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींनी कृष्णमोहन तिवारी या तरुणाला नोकरी देण्याच्या बहान्याने डोंबिवली मध्ये बोलवून लुटण्याचा प्रयत्न केला. कृष्णमोहन  याने प्रतिकार केला असता आरोपीने लोखंडी हत्याराने मारहाण करून जबर जखमी करून खंबालपाडा याठिकाणी फेकून दिले. ही घटना वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तरुणाला डोंबिवलीतील शिवम रुग्णालयात दाखल केले. उपचाऱ्या दरम्यान कृष्णमोहन तिवारी यांचा मृत्य झाला. कोणताही पुरावा नसताना मानपाडा पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहिती च्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ४ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश असल्याचे कल्याण परिमंडळ -३ चे उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून सांगण्यात आले.कृष्णमोहन हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे कतारमधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका प्लेसमेंट सेंटरकडे त्याने आपली माहिती दिली होती. या प्लेसमेंट सेंटरमधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने त्याला मोबाईलवर संपर्क केला आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले.

 त्यानंतर रिहानने साथीदार सागर पोन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले. 

डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे,मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवारगुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवेअनिल भिसेपोलीस हवालदार काटकरकदमचौधरीपोलीस नाईक यादवघुगेसोनवणेभोसलेडी. एस.गडगेकिनरेपवारपाटीलकांदळकरआर.जी.खिलारेकोळीमंझा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Post a Comment

0 Comments