■तिरंगा जागृती विचार मंच, हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि टिम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम..
कल्याण , कुणाल म्हात्रे : रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठ कर्तव्य आहे आपण केलेल्या रक्तदानामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचु शकतात त्याचबरोबर रक्तदान ही लोकचळवळ व्हावी या हेतुने कल्याण शहरांत शनिवारी तिरंगा जागृती विचार मंच, हर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि टिम परिवर्तनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १३९ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५ लाख रुपयांचा विमा देखील विनाशुल्क देण्यात आला.
रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन टीम परिवर्तनचे अविनाश पाटील, स्वप्नील शिरसाठ, नामदेव येडगे, भुषण राजेशिर्के त्याचबरोबर तिरंगा जागृती विचार मंचचे चेतन म्हामुणकर, गिरीश कदम, संजय गोडसे, कोमल म्हामुणकर, समीर जोशी, अजित कासार, संदीप राजपुत, राकेश मोरे, नितेश पडवळ, मारुती राठोड, विष्णु नावले यांनी केले. या शिबीरात अवयवदान जनजागृती करण्यात आली यांसाठी एन. पी. अय्यर, अशोक बरवाणकर, प्रमोद जोशी, प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले. रक्तदान हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे असे शिबिर यापुढेही आम्हीं घेणार असल्याचे तिरंगा जागृती विचार मंचचे संस्थापक सचिन यादवडे यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरासाठी संतोष भोईर यांनी विशेष सहकार्य केले. रक्तदान आणि अवयवदानाच्या चळवळीत युवकांनी सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन आप्पा घोरपडे यांनी यावेळीं केले. अक्षय ब्लड सेंटर, हडपसर पुणे यांच्या टीमने रक्तदान शिबिरात आपले अमुल्य योगदान दिले. रक्तदान विषयक युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी कोणताही रुग्ण रक्तावाचून दगावू नये यांसाठी यापुढील काळात आम्हीं विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने अनेक समाजोपयोगी कामे करणार आहोत असे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले.
0 Comments