जन गण मन शाळेची अनोखी प्रेरणा विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून मिळाली सौर ऊर्जेची संकल्पना

डोंबिवली ( शंकर जाधव )  विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून डोंबिवली पश्चिम येथील जन - गण - मन शाळेत सौर ऊर्जेची संकल्पना राबविण्यात आली असून  संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही शाळा पर्यावरण पूरक प्रकल्प राबवत असल्याचे दिसून येत आहे. 
           सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मात्र अशा परिस्थितीत देखील जन गण मन शाळेत विविध पर्यावरण पूरक प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पात रेन वॉटर हार्वेस्टिंग , सोलर प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळेला ७५ केव्ही ऊर्जेची गरज आहे. याचा विचार करत सोलार सिस्टीम उभारण्यात आली. त्यानंतर शाळेत सध्या ३० केव्ही ऊर्जा तयार केली जात आहे.  ही सर्व वीज एम ए सी बी ला दिली जाते. 

          यामुळे वीज निर्मिती तयार करण्यास मदत होत असून जन गण मन शाळेला विजेचे बिल कमी होत आहे. इतकेच नव्हे तर या शाळेत या शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या रेल्वेच्या जागेवर देखील घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये रेल्वे चे काम चालू असल्यामुळे घनकचरा प्रकल्प थांबवण्यात आला असला तरी या खदान असलेल्या जागेत जनगणमन शाळेतर्फे मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आल्यामुळे रेल्वेचे कोटी रुपये वाचले अशी  माहिती देण्यात आली आहे. 
            या शाळेमुळे आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे दिसून येत आहे. कोरोना नंतर अनेक शाळांमध्ये फी संदर्भात तणाव निर्माण झाला होता मात्र आम्ही आद्यापही विद्यार्थांना कोणत्याही प्रकारे फी संदर्भात विचारणा करण्यात आली नाही त्यामुळे पालक देखील समाधानी असून पालकांना आपण समजून घेतलं तर आपल्याला देखील ते समजून घेतात असे डॉ. राजकुमार कोल्हे आणि प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments