सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश


■राज्यभरार विविध ठिकाणी गुन्हे दाखल पॅरोल रजेवर असतानाही केले गुन्हे...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र राज्यात वेगवेगळया जिल्हयात सराफा दुकान फोडुन घरफोडी चोरी करणेदरोडेंदरोडयाची तयारीखुनाचा प्रयत्न व सोनसाखळी चोरी अश्या अकरा  गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. शिवासिंग विरसिंग दुधानी (२८) रा. आंबवली  असे अटक केलेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारच नाव आहे.१८ जून  रोजी सकाळच्या सुमारास फिर्यादी पुनम सिंग (५७)  या कल्याण पश्चिम भागातील  ठाणगेवाडीकडुन रामबागकडे जाणाऱ्या रोडवरून मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्याच सुमारास ठाणगेवाडी भागात मोटारसायकल वरून समोरून आलेल्या दोन आरोपी पैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या  गळ्यातील सोन्याचे  मंगळसूत्र  जबरीने हिसकावून धूम ठोकली होती. याप्रकरणी  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला. त्यानंतर या गुन्हयाच्या आरोपीचा शोध घेण्याकरीता खास पथकाची नेमणूक करण्यात आली. या तपासामध्ये  सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलच्या तांत्रीक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहीती प्राप्त करून  सराईत गुन्हेगार हा  पॅरोल रजेवर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.  त्यानंतर आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली.पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडे सखोल चौकशी केली असता तो पॅरोल रजेवर असताना त्यानी त्याच्या  साथीदारासह रसायनी पोलीस स्टेशन रायगड, वडकी पोलीस स्टेशन यवतमाळ, वडनेर पोलीस स्टेशन वर्धामौदा पोलीस स्टेशन नागपुरजवाहरनगर पोलीस स्टेशन भंडारासाकोली पोलीस स्टेशनलावणी पोलीस स्टेशन भंडारा या ठिकाणी सराफा दुकाने फोडून घरफोडी केली असून या गुन्हयात तो फरार होता. आतापर्यत एकूण ११ गुन्हयात अटक करणे बाकी असल्याची माहिती  सहा. पोलीस आयुक्त  अनिल पोवार यांनी दिली आहे.या आरोपीने साथीदारासह दरोडा टाकणेदरोड्याची तयारीखुनाचा प्रयत्न सरकारी नोकरावर हा सोनसाखळी चोरी. मोटार सायकल चोरी अशा प्रकारचे २३ गुन्हे केले आहेत. आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस पथक काढत आहे. 
आरोपी शिवासिंग विरसिंग दुधानी याने त्याचे साथीदारासह कल्याण परीसरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असून  महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ४ गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे. या  गुन्हयातील  मंगळसूत्ररोख रक्कमरोडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल असा एकूण १लाख ३४हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. इतरही गुन्हयाचा तपास पोलीस पथक करीत आहेत.       सहा. पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि कल्याणजी घेटेपोनि. संभाजी जाधवपोनि. प्रदिप पाटीलसपोनि. दिपक सरोदे देविदास ढोलेपोहवा  निकाळेचित्तेभालेरावशिर्केपोना  भोईरमधाळेहासेटिकेकरजाधवभालेराव आदींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व तांत्रीक मुददयांवर गुन्हयाचा अविरतपणे व चिकाटीने तपास करून आरोपीला अटक केली आहे. 

Post a Comment

0 Comments