भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..

 


भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं   मनसेचे जुने कार्यकर्ते  अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी  भाड्याच्या गळ्यात सुरु  असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता.


             त्यानंतर गाळे मालकाने एक महिन्याचे भाडे  थकल्याने मालकाने थेट मनसेच्या कार्यालयाला टाळे मारल्याने मनसेचे भानुशाली यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असताना याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी आणि उपाध्यक्ष प्रविण देवकर यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन भानुशाली आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांसमोरच अपशब्द बोलून धमकावल्याने भयभीत झाल्या मुळे भानुशाली यांच्या पत्नीने शहर अध्यक्ष मनोज गुळवी, प्रविण देवकर यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात  अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे .             त्यामुळे मनसेमधील कार्यकर्ते आणि शहर अध्यक्ष यांचा  वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहर अध्यक्ष यांच्या मनमाणीमुळे मनसेला गळती लागण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी मनसेचे कार्यकर्ते करीत आहे.या संदर्भात शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असताना संपर्क होऊ शकला नाही....

Post a Comment

0 Comments