डोंबिवली ( शंकर जाधव ) भारत देश बंदची हाक देत ठिकठिकाणी विविध पक्षांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन व निदर्शने केली.शेतकऱ्यांच्या आंदोलना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने जाहीर पाठिंबा दर्शवत आंदोलन केले. डोंबिवलीजवळील मानपाडा सर्कल येथे राष्ट्रवादीचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष दत्तात्रय वझे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात कल्याण ग्रामिण अध्यक्ष दत्तात्रय वझे, गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, रंगनाथ शेठ ठाकुर, वल्ली राजन, बाळाराम ठाकुर, रमेश पाटील, वासुदेव संते, संतोष संते,अँड. ब्रम्हा माळी,नासिर शेख,योगेश डांगे, तेजस पाटील, अभिमन्यू म्हात्रे, रमेश देसले, हरिश्चंद्र देसले, विश्वास माळी, बाळकृष्ण कापडी,शमीन शेख, गौरव डामरे, महिला अध्यक्षा ऊज्वला भोसले,सुरैय्या पटेल,ज्योती पाटील,माया गुरव, शकुंतला दुबे, बबिता राम, आणि इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी दत्ता वझे म्हणाले, देशात शेतकऱ्यांंना मोदी सरकारने कमकुवत केली आहे.
दिल्लीत दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोदीसरकार गंभीर्याने घेत नाहीत.सरकारला अजूनही जाग कशी आली नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करा, नवीन येणारे ववीज बिल रद्द करा, जीवनावश्यक वस्तूंची महागाई रोखा, पेट्रोल, डीझेल, घरघुती गॅसची महागाई थांबवा या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. आंदोलनात मोदि सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0 Comments