भिवंडीत मनसेच्या महानगरपालिका लढ्याला यश.दहा वर्षा नंतर कामगारांना मिळाले रेनकोट...

भिवंडी दि 7(प्रतिनिधी )गेल्या 10 वर्षा पासून भिवंडी  शहर महानगर पालिकेने सर्व कामगारांना रेनकोट पासून वंचित ठेवले होते.महानगरपालिकेत नेहमीच विविध प्रस्ताव मंजूर होतात पण त्याला पाठपुरावा केल्या शिवाय कुठलाही प्रस्ताव हा निवेदेत बदलत नाही.भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना पावसा पासून सुरक्षित राहून व नित्य नियमाने काम करावं लागत असत.खर पाहता कामगारांना रेनकोट उपलब्ध करून देण हे काम महानगरपालिकेच  आहे. 
          तरी देखील महापालिका प्रशासन हे कामगारांच्या बाबतीत फक्त वेळ काढू पण करत होती.त्यांना मिळणाऱ्या सोई सुविधा पासुन वंचित ठेवलं जातं असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेच्या माध्यमातून सातत्याने महापालिके कडे या संदर्भात पत्रव्यवहार करून पावसाळा संपण्याच्या आधी रेनकोट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लावून धरली होती.  
          महापालिका अधिकारी यांनी त्या प्रमाणे काम केलं व महानगरपालिकेतील आमच्या सर्व स्त्री पुरुष कामगारांना रेनकोट उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व कामगारांनी  राज ठाकरे  आभार मानले. तर मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष  संतोष साळवी व युनियनच्या सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .

Post a Comment

0 Comments